कोरोनामुळे मयत पत्रकाराच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी
सावदा संपूर्ण भारतात गेल्या वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे हाहाकार माजला आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी अनेक पातळीवर सर्व नागरिक,कर्मचारी,अधिकारी व अनेक कोरोना योद्धे आपले प्राण धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत घेत आहे.त्याचप्रमाणे अनेक पत्रकार सुद्धा कोरोना योध्याच्या भूमिकेत गेल्या वर्षभरापासून आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहे सावदा येथील पत्रकार आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यात त्यांना आपला प्राण गमवावा लागला.
दि 25 मार्च 2021 गुरुवार रोजी सावदा येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सलग्न ओरिजनल पत्रकार संघाचे पदाधिकारी व दै सामानाचे सावदा प्रतिनिधी कैलाससिंह गणपतसिंग परदेशी याचे कोरोनाने निधन झाले याकरिता शासनाने मयत पत्रकाराच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी दि,26 मार्च 2021 रोजी ओरिजनल पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुफ शहा,उपघ्याक्ष व जिल्हा संघटक-कैलास लवगडे ,सचिव-दीपक श्रावगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष भानुदास भारंबे,प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कुलकर्णी, सदस्य फरीद शेख, सौ,कविता सकळकर आदी नी प्रांतअधिकारी कैलास कडलक फैजपूर विभाग फैजपूर यांना निवेदन देण्यात आहे,सादर निवेदनाची प्रत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामना मुख्य संपादक रश्मी ठाकरे, संजय राऊत, मुख्यमंत्री मुख्य सचिव विलास खारगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अध्यक्ष मुंडे साहेब, पालक मंत्री गुलाबराव पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव, आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर, आमदार शिरीष चौधरी रावेर, मुख्याधिकारी सौरभ जोशी नगरपरिषद सावदा, इत्यादी सर्वांना मेल द्वारे पाठविण्यात आली आहे.






