Maharashtra

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड ड्रग डिस्कवरी” आधारित ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स सुरू
आकरा हजार विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतला सहभाग

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर -सध्या करोना
महामारीच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देशातील शैक्षणिक संस्था बंद असताना विद्यार्थी व प्राध्यापक वर्गासाठी स्वेरीच्या कॉलेज ऑफ फार्मसीकडून ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूरचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी हा कोर्स डिझाईन केला आहे “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड ड्रग डिस्कवरी”असा फ्री कोर्स सुरू करण्यात आला. या विषयावरील देशातूनच नव्हे तर जगातील पहिला कोर्स आहे. कोणताही युनिव्हर्सिटीच्या आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमात हा विषय नसून अगदी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना येणारा काळाच्या पुढे नेण्यासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स ऑनलाईन असून यामध्ये टिटोरियल आहेत. विविध प्रकारचे व्हिडिओ यामध्ये समाविष्ट आहेत. हे सर्व टिटोरियल पूर्ण केल्यानंतर त्याची परीक्षा देऊनच हा कोर्स पूर्ण होतो व त्याचे प्रमाणपत्र मिळते. आत्तापर्यंत जवळपास आकरा हजार विद्यार्थी व प्राध्यापकांनी हा कोर्स पूर्ण केला आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना अतिशय चांगल्या प्रकारचा ऑनलाइन कोर्स करण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग आनंदी आहे. हा कोर्स करत असताना प्रा. प्रदीप जाधव यांचाही सहभाग लाभला आहे. अजूनही जास्तीत जास्त विद्यार्थी व प्राध्यापकांनी या ऑनलाईन कोर्सचा फायदा घ्यावा असे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी प्रा. जाधव (मोबाईल- ९९७५३९१०४८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button