नागरीकांच्या समस्या जाणून, सोडवण्याचा प्रयत्न करा.आंदोलने सुरूच ठेवावी- विलास पारकर
प्रतिनिधी.भिमराव कोचुरे
सविस्तर वृत्त असे की, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची भुसावळ विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेतील सत्ताधारी सोडवणूक करू शकले नाही, शिवसेनेकडे जनता आशेने पहात आहे. गल्ली गल्लीतील नागरिकांच्या नागरी समस्या जाणून घ्या. नागरिकांशी संवाद साधून त्यावर स्थानिक सत्ताधाऱ्यांना योग्य उपाययोजना करायला भाग पाडा, प्रसंगी शिवसेना स्टाईलने आंदोलने करा असे आदेश भुसावळ विधानसभा क्षेत्राच्या बैठकीत रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी केले.वरणगाव येथे रावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पारकर बोलत होते. या बैठकीला शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्यासह सर्व उपतालुका प्रमुख, शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा दिला. अनेक मुस्लीम तरुणांनी याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रत्येक प्रभागातील जुन्या शिवसैनिकांना मुख्य प्रवाहात सामील केले जाईल तसेच शिवसेनेच्या जुन्या शाखांचे नूतनीकरण करून तेथे नवीन युवकांना शिवसेनेत सामील करून शाखांच्या माध्यमातून नागरी कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आगामी जिल्हा प्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव पालिका व सर्व ग्रामपंचायत निवडणूकित विजयश्री खेचून आणण्यासाठी सज्ज राहा. शिवसैनिकांनी आपली नाळ सर्वसामान्यांशी जुडवून प्रत्येक माणूस शिवसेनेशी जुडवावा, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार योग्य कार्य करीत आहे, शेतकरी, व्यापारी व जनसामान्यांना सर्व सरकारची योजनांची माहिती द्या असे सांगून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेला विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी बैठकीत केले.






