तुम्ही या तर..मग आम्ही तुम्हाला तोडू; मनसेचा इशारा..
मनसे आणि शिवसेनेतील वाद आता चव्हाटय़ावर आला आहे.
मुंबई
तुम्ही वीज कनेक्शन तोडा, आम्ही तुम्हाला तोडू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असा स्पष्ट इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. वाढीव वीज बिलाविरोधात राज्यव्यापी आंदोलन केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी वरळीत बॅनरबाजी केली आहे. वीज तोडणीसाठी आल्यास संपर्क साधावा असे मनसेने वरळीत बॅनर लावले आहेत.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. त्यात या विरोधाचा स्पष्ट उल्लेख केलेला असून आता पर्यंत शांत राहिलो पण यापुढे गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशारा संतोष धुरी यांनी दिला. सरकारला वाढीव वीज बिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू, तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करु असा इशाराही दिला आहे.आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, मात्र वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.






