Faijpur

फैजपूर ला कंटेन्मेंट झोन मध्ये शीतलता द्या व्यापारी बांधवांची मुख्याधिकारी कडे मागणी

फैजपूर ला कंटेन्मेंट झोन मध्ये शीतलता द्या व्यापारी बांधवांची मुख्याधिकारी कडे मागणी

सलीम पिंजारी

फैजपूर येथील कोविड 19 चे 2 रुग्ण आढळलेल्या दक्षिण बाहेरपेठ,आठवडे बाजारपेठ व पोस्ट गल्ली,हा परिसर शहरवासीयांच्या आरोग्यासाठी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या आदेशानुसार नगरपालिका व पोलीस प्रशानाने तात्काळ सील करून कोविड19 नाशक फवारणी सह विशेष साफसफाई यंत्रना राबविली गेली या सर्व विभागास 28 मे पर्यंत कँटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते हे दोघे रुग्ण बरे होवून 25 मे रोजी घरी सुखरूप घरी परतले आहेत आणि शहर कोरोना मुक्त मात्र नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात व्यापार,उद्योगाला काही शर्ती अटीवर चालू करण्याचे मुभा मिळाली मात्र फैजपूर मुख्याधिकारी यांनी काल फैजपूर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष यांचे नावे एका लेखी आदेशानुसार शहरातील या कंटेन्मेंट झोन मधील व्यापार – उद्योग वगळता इतरत्र ही मुभा दिली असल्याने या भागातील सर्व व्यापारी उद्योजकांनी आज सकाळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना नगरपरिषद कार्यलय बाहेर शोषल डिस्टन द्वारे भेट घेत या कंटेन्मेंट झोन मध्ये सुध्दा व्यापार उद्योगाला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मुभा मिळण्याची एकमुखी मागणी केली आहे.

यावेळी मुख्याधिकारी चव्हाण यांनी व्यापारी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले व आपल्या भावना मी जाणतो मात्र शासकीय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कँटेन्मेंट झोन ला 28 दिवसाचा कालावधी आहे त्यानुसार च याभागात काही काळ हे कटाक्ष पाळणे आपल्या व शहरवासीयांच्या दृष्टीने हितावह आहे याबाबी आपण सर्वांनी आता पर्यत सहकार्य केले तेच सहकार्य यापुढे ही अपेक्षित आहे

याप्रसंगी नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण उपनगराध्यक्ष रशिद तडवी काँग्रेस गटनेते नगरसेवक कलीमखान मणियार, नगरसेवक प्रभाकर सपकाळे,देवेंद्र साळी, समाजसेवक रघुनाथ कुंभार, सुनिल वाढे, ज्ञानदेव ढाके, प्रकाश बालांनी,विनोद बदलानी,अतुल कापडे, संतोष परदेशी,शेख रज्जाक,व्यापारी असो.सचिव संजय सराफ यासह बहुसंख्य व्यापारी बांधव उपस्थित होते
l

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button