Amalner

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक…!तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच..!डांगरी येथील 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..!

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक…!तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच..!डांगरी येथील 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..!

अमळनेर तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील मच्छिंद्र सदाशिव भोई वय-२४ वर्षीय तरुणाने दि २९ रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, मच्छिंद्र भोई याने घरातील सऱ्या ला दोराने फाशी घेतली हे समजताच त्याला नातेवाइकानी तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले पण तोपर्यंत उशीर झाला होता.डॉ नी त्याला मृत घोषीत केले. त्याच्यावर आज डांगरी येथे अत्यन्त शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

मच्छिंद्रचे एम एस डब्लू पर्यंत शिक्षण झाले होते.पण गेल्या काही दिवसांपासून तो निराश व मानसिक तणावाखाली होता. तो सदाशिव भोई यांचा एकुलता एक मुलगा होता.6 मुली झाल्यावर मच्छिंद्रचा जन्म झाल्याने लाडाने वाढविलेला होता.त्याच्या आत्महत्येमुळे आई -वडील, बहिणी यांना फार मोठा धक्का बसला आहे.त्याच्या मृत्युचे कारण समजले नाही.मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार बालकृष्ण शिंदे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button