Amalner

प्रामाणिक पणा जिवंत आहे याचा  प्रत्यय अमळनेरात आला पत्रकार सुनील करंदीकर यांनी लाखांची सापड़लेली थैली केली परत

प्रामाणिक पणा जिवंत आहे याचा प्रत्यय अमळनेरात आला
पत्रकार सुनील करंदीकर यांनी लाखांची सापड़लेली थैली केली परत

अमळनेर:

मोटरसायकलव्रर रहिलेली एकूण दीड लाख रु ची थैली प्रामाणीकपणे अमळनेर शहरातील जेष्ठ पत्रकार सुनिल करंदीकर यांनी परत केली.
या बाबत माहिती अशी की,अमळनेर येथील संजय टी चे मालक संजय पाटिल यांनी आपल्या आई च्या उपचारासाठी दीड लाख रु आणले व ते गाडीच्या डीक्कित ठेवले व आपल्या दुकानाजवळ गाड़ी लावून पैशाची थैली काढून ती त्या मोटरसायकल वर ठेवून गाडि च्या सिट वर ते ती थैली विसरून गेले.ती थैली पत्रकार सुनील करंदीकर यांना सापडली त्यांनी ती पैशांची थैलिच्या मालकाचा तपास करून त्यांच्या कड़े सुपुर्द केली.त्यामुळे सजंय पाटिल यांना हायसे वाटले व् श्री सुनिल करंदीकर यांचे आभार मानले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार सुनील करंदीकर आहेत त्यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button