Amalner: बिल देण्याच्या किरकोळ वादातून तरुणांवर चाकू हल्ला..! दोघे गंभीर जखमी..!
अमळनेर बिल देण्याच्या किरकोळ वादातून दोन मित्रावर एकाने चाकू हल्ला केल्याचा खळबळजनक घटना काल रात्री घडली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, ऋषिकेश श्याम सोनार (22, रा. पैलाड अमळनेर), तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिक जवळील एका देवीचे दर्शन घेऊन अमळनेराला परत आले. ते मित्रांसोबत एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले. तेथे बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला यात ऋषिकेश सोनार गांभीर जखमी आहे. धुळे सिव्हिल ला बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटील ही जखमी आहे. यात मुख्य आरोपी दादू पाटील असून त्याला नाशिक तेथील त्याचा मित्र दीपक बोरसे याच्याकडून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्या दोघानाही ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणले आहे. घटना कशी आणि काय कारणावरून झाली याची कसून
चौकशी करीत आहेत. या प्रकारातील जखमी तरुण हे शुद्धीवर आल्या नंतर घटनेचा सविस्तर उलगडा होणार आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे आणि पोलिसांची टीम कसून तपास करीत आहेत.






