फैजपुरात नगर पालिकेची धडक कारवाईत
अमर शॉपिंग मॉलला ठोकले सील
प्रतिनिधी सलीम पिंजारी
कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलला सील ठोकण्याची कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी शनिवारी केली. सलग दुसऱ्या दिवशी अशी कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.शुक्रवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी शहरातील एक कापड दुकान व ब्रॅडी हाऊसवर नियमाचे उल्लंघन केल्याने सील ठोकले होते.
नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नगरप्रशासनाची धडक कारवाईत दोन – तीन दिवसांपूर्वी च कापड दुकान व ब्रांडी हाऊसवर नियमाचे उल्लंघन केtल्याने सील ठोकले होते.त्यानंतर व्यावसायिक व नागरिक काहीतरी धडा घेतील असे वाटत असतानाच बसस्थानकासमोरील अमर शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच याठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मुख्याधिकारी किशोर चव्हाण, विपूल साळुंखे व पालिकेचे कर्मचारी यांनी धडक कारवाईत मॉल ला सील करण्याची कारवाई केली आहे अशी माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली ते म्हणाले की व्यापारी बांधवांनी व शहरवासीयांनी संयम ठेवीत कोरोना बाबी अधिक सतर्कता बाळगणे हे स्वतः व शहरवासीयांच्या दृष्टिकोनातून हे कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे






