sawada

गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करावे:मात्र कायद्याच्या चौकटीत-एस.पी डॉ प्रवीण मुंडे जळगांव

गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करावे:मात्र कायद्याच्या चौकटीत-एस.पी डॉ प्रवीण मुंडे जळगांव

सावदा पो.स्टे.मध्ये घेण्यात आली शांतता समितीची बैठक

“कोरोना काळातील लागून नियम अटी आता लागू नाही.सन २०१९ प्रमाणे यंदाचे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करावे.मात्र कायद्याच्या चौकटीत राहून जेणेकरून इतरांची भावना दुखू नये.लाऊडिस स्पीकरचे साऊंड बाबत दक्षता घ्यावी.या शहरात आजपावतो कोणत्याही सण उत्सवला गालबोट लागलेला नाही हे अतिशय चांगली व आनंदाची बाब आहे.तरी गालबोट कसे लागतात यासाठी विविध उदाहरण देत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय साठीच पोलीस आहे.तरी नागरिकांनी पोलीस मित्र म्हणून सहकार्य करावे व उत्सव आनंदाने साजरा करावा अशा सूचना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एसपी डॉ.प्रवीण मुंडे यांनी देत आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आगामी गणेश उत्सव व पोळा सन निमित्त आज दि.२५/८/२०२२ रोजी दु.४-वाजता सावदा पोलीस ठाण्याच्या आवारात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने उत्तमरित्या स्थानिक पोलीसांच्या वतीने घेण्यात आलेली शांतता समितीच्या बैठकीत शहर व गाव,खेड्यांतील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष,सदस्यां सह प्रतिष्ठित व मान्यवरांची उपस्थिती संखेत होती.

बैठकीच्या सुरुवात आधी सावदा शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सरळ जोडलेले कनेक्शन सावदा पोलीस स्टेशनाच्या एलईडी स्क्रीनचे उ उद्घाटन जळगांव जिल्ह्याची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उद्योजक शब्बीर हुसैन अख्तर हुसैन उर्फ बाबू शेठ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, एपीआय देविदास इंगोले,पो.उ.नि समाधान गायकवाड,मुख्याधिकारी किशोर चव्हाण, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सपकाळे,फैजपूर पोलीस स्टेशनची एपीआय आखेगावकर नंदू पाटील सर इत्यादी उपस्थित होते.

यानंतर शांतता समितीच्या बैठकीत एस पी डॉ.प्रवीण मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, वीज वितरणचे मुख्यकार्यकारी अभियंता सपकाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.या बैठकीच्या सुरुवातीला सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सर्व समावेश अशे विचार मांडताना इतर कोणाचीही भावना दुखू नये. तसेच कोणताही गालबोट लागू नये अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात यंदाचा गणेश उत्सव मिरवणूक साजरी केली जाईल. अशी सर्वांच्या वतीने ग्वाही दित शहरात श्री गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणूकीस परवानगी दिली जावी.अशी अपेक्षा यावेळी केली असता हे लक्षात ठेवून एस पी डॉ.प्रवीण मुंडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात यास मुभा दिलीजावी असे पोलिसांना सांगितले.यानंतर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,राजेश वानखेडे यांनी मांडलेल्या मताशी मी सहमत असून गणपती उत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहा व आनंदाने कायद्याचा चौकटीत पार पाडले जाईल यात कोणतेही दुमत नाही.मात्र शहरातील मिरवणूक ज्या रस्त्यावरून जाते त्यात काही खड्डे असतील तर ते बुजले जावे.तसेच गणेश विसर्जनासाठी अंथरूण धरणावर जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डेही बुजले जावे.आशी अशी मागणी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.यावेळी माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,सुरज परदेशी उर्फ बद्री,नगरसेविका नंदाताई लोखंडे,मीनाक्षी कोल्हे,गजू ठोसरे,पिंटू धांडे चिनावल येथील श्रीकांत सरोदे,इरफान सेठ व सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष नागरीक सह गोपनीय पो.यशवंत टाहाकळे,देवा पाटील,उमेश पाटील,रायकर सपकाळे दादा व स्टाप इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button