Amalner

? धक्कादायक..वासरे येथील पंधरा वर्षीय मुलाने केली गळफास घेऊन आत्महत्या.. मारवड पोलिसात करण्यात आली अकस्मात मृत्यूची नोंद..

वासरे येथील पंधरा वर्षीय मुलाने केली गळफास घेऊन आत्महत्या.. मारवड पोलिसात करण्यात आली अकस्मात मृत्यूची नोंद..

रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील वासरे येथील पंधरा वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

चंदन विजय पाटील असे या मुलाचे नाव असून सदर घटना घडली तेव्हा मुलाचे आई वडील शेतात गेले होते. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घराजवळ राहणार दीपक पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आली असता त्याने तत्काळ पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

सदर मयत हा नववीच्या वर्षात शिकत होता. पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पो. ना. मुकेश साळुंखे करीत आहेत. आत्महत्येेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button