चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
काल दिनांक 13 रोजी सायंकाळी तालुक्यातील वैजापूर येथे दोन आदिवासी अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली घटनेची माहीती कळताच आज सकाळी चोपडा तालुक्याचे माजी आमदार जगदीश भाऊ वळवी यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे जावून पिडित मूली व त्यांचे कुटुंबिय आणि वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील, डॉ पंकज पाटील, स्रीरोग तज्ञ डॉ पवन पाटील यांच्याशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली.सदरील घटना मानवतेला काळीमा फ़ासणारी असून ,मानवमन सुन्न करणारी आहे अशा वेदनादायी शब्दात भावना व्यक्त केल्या .सदर घटनेतील नराधम आरोपीला कायदयाने कठोर शिक्षा मिळावी म्हणून आपण स्वतः संबधित अधिकारी वर्गाशी बोलू असे सांगत असतांना जगदीशभाऊ वळवी यांनी पीडीत परिवार डॉक्टर यांच्याशी बोलतांना सूचना केली की,पीडीत मुलींच्या वैद्यकीय परिस्थिती नुसार त्यांना कुठे इतर हॉस्पिटलला रेफर करायचे असेल अथवा कोणी बाहेरचे तज्ञ डॉक्टर बोलवायचे असतील किंवा बाहेरुन काही औषधी वगैरे मागवायच्या असतील तर मी स्वतः सर्व खर्च करेन असे आश्वासन दिले







