Amalner

? अमळनेर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कोविड सेंटर मधून बेपत्ता दुसर्‍या व्यक्तिचा गेला बळी

अमळनेर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कोविड सेंटर मधून बेपत्ता दुसर्‍या व्यक्तिचा गेला बळी

दोषीवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल : माजी आमदार स्मिताताई वाघ

नूरखान

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. परंतु फक्त अमळनेर तालुक्यातच अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. कारण याला अमळनेर प्रशासनाच्या हलगर्जीपणा जबाबदार आहे. म्हणूनच कोविड सेंटर मधून बेपत्ता दुसर्‍या व्यक्तिचा आज जीव गेला आहे. गरिबांना जीव प्यारा नसतो का..? हीच घटना एखाद्या श्रीमंतांच्या बाबत झाली असती तर त्याच्यावर रान उठले असते. गेल्या महिन्यात निंबा वाणी या बेपत्ता व्यक्तिचा पारोळा येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी ही आवाज उठवला होता. तेव्हा राजपत्रित अधिकार्‍यांनी पत्र काढून कारवाईला विरोध केला होता. तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर आज हलगर्जीपणामुळे दुसरा बळी गेला नसता. याचे पातक (पाप ) आता कोण घेणार. असा सवालही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपस्थित केला आहे.

तसेच कोविड सेंटर मधून माणूस बेपत्ता होऊन जातो तरी कोणाला खबर राहत नाही. आरोग्य आणि महसूल प्रशासनाने या सेंटरवर नियमित पोलीस राहत नसल्याचे नेहमी निदर्शनास आणून दिले आहे. तरीही पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत नाही म्हणून याला पोलीस ही तेवढेच जबाबदार आहेत. म्हणून यातील प्रत्येक दोषीवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button