Maharashtra

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे जपानी भाषेच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर येथे जपानी भाषेच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात. लॉक डाऊन च्या काळातही स्वेरीने आपली ज्ञानसाधना अखंड सुरू ठेवली आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा एक भाग म्हणून दिनांक ९ जून २०२० पासून जपानी भाषेच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली. जपानी भाषेचे ज्ञान अवगत केलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकण्यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला असून सदर कोर्स जपानच्या मिकीको इवासाकी ह्या ऑनलाइन पद्धतीने घेणार आहेत. या कोर्स मध्ये एकूण १६ सेशन्स आहेत व त्यानंतर नियमित सराव सेशन्स होतील.या कोर्ससाठी प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीतील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रा. डॉ. सोमनाथ ठिगळे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या कोर्ससाठी एकूण २ बॅचेस दिनांक ९ जून २०२० पासून नियमितपणे सुरू होत आहेत. हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जपानी भाषेसोबतच तेथील तंत्रज्ञान व जपानी संस्कृतीची देखील माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर आय.एल.पी.डी.यांच्या मार्फत प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याचे समन्वयक डॉ.ठिगळे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button