Amalner

Amalner: महारक्तदान अभियानात लायन्स क्लब अमळनेरचा सक्रिय सहभाग,प्रताप महाविद्यालयात उभारणार रक्तदान केंद्र

Amalner: महारक्तदान अभियानात लायन्स क्लब अमळनेरचा सक्रिय सहभाग,प्रताप महाविद्यालयात उभारणार रक्तदान केंद्र

अमळनेर(प्रतिनिधी)
अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद,लायन्स क्लब अमळनेर आयोजित महारक्तदान शिबिराला शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या महारक्तदान शिबिरात विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने १००८ पिशवी रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लायन्स क्लब अमळनेर आयोजित या महारक्तदान शिबिराचे स्वतंत्र केंद्र प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे.या शिबिरासाठी लायन्स क्लब, खानदेश शिक्षण मंडळ व लिओ क्लब च्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.
१७ सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या रक्तदान केंद्रावर सकाळी ८ ते ५ या वेळेत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन लायन्स क्लब चे प्रेसिडेंट योगेश मुंदडा तसेच लायन्स क्लब ,लिओ क्लब व खानदेश शिक्षण मंडळ अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button