Yawal

हिंगोणा मोर धरण प्रतिबंधक क्षेत्र घोषीत ..प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले

हिंगोणा मोर धरण प्रतिबंधक क्षेत्र घोषीत..प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर धरण क्षेत्रात मागील काही दिवसापासुन पर्यटनाचा भाग म्हणुन धरणावर जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची मोठी गर्दी होत असुन या गर्दीमुळे सध्या कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगा मुळे लागु करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसुन येत असल्याने यापुढे धरणावर गर्दी करणाऱ्यांवर कायद्याशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिले आहे .

या संदर्भात प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी महसुल प्रशासनास दिनांक ३ सप्टेंबर २o२० रोजी पाठवलेल्या आदेशपत्रात म्हटले आहे की , सार्वजनीक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात उद्धभवलेल्या कोवीड १९ कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७हा३१ मार्च २०२०पासुन संपुर्ण राज्यात लागु करण्यात आला असुन , यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले मोर प्रकल्प धरण या ठिकाणी मागील काही दिवसापासुन या धरणावर रविवार या सुटीच्या दिवशी परिसरातुन आणि जळगाव जिल्ह्यातुन मोठया प्रमाणावर धरणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने या गर्दीमुळे कोरोना विषाणुसंसर्ग प्रतिबंधक कायद्याचा उल्लंघन होत असल्याने या गोंधळामुळे संसर्ग वाढीला लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन , खबरदारीचा उपाय म्हणुन प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी मोर प्रकल्प धरणास प्रतिबंधक क्षेत्र म्हणुन घोषीत केले असुन या संदर्भात धरणाकडे जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करावीत व या मार्गाने कायद्यामोडुन मोटर वाहनानी जाणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे आदेश प्रशासनास दिले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button