सावदा-पिंपरुळ रस्त्यावर भीषण अपघात १ महिला जागीच ठार तर ५ जखमी.
सावदा तालुका रावेर प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा-पिंपरूळ दरम्यान व सध्या नवीन तयार झालेले आमदार भिकनगाव महामार्ग वर चालकाने त्याचे ताब्यातील फॉर्च्युनर वाहन बेजबाबदारपणे चालवताना भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनास जोरदार धडक दिली असता त्यात त्यांची गाडी पलटी झाल्याने १ महिला जागीच ठार होऊन पाच जखमी झाल्याची घटना घडलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोठा वाघोदा येथील सुप्रसिद्ध केळीचे व्यापारी भरत वसंत सुपे यांच्याकडे येत्या ५ डिसेंबर रोजी (लग्न) प्रित्यर्थ मोठा स्वागत समारंभ सावदा येथे आयोजित केलेला होता. मात्र आज दि.२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०-४५ वाजेच्या सुमारास सावदा येथून जळगांव कडे फॉर्च्युनर कार कामानिमित्त चालक म्हणून घेऊन जाणारे कृष्णा भरत सुपे यांनी गाडी भरधाव वेगाने चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याने पुढे जात असलेली टाटा इंडिका कार क्र. एम एच १९ एपी २६१२ हिस जोरदार धडक दिली आस्था त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्र. डी एल १० सी इ ६१६५ पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुलिंबाची झाडावर भरधाव वेगाने आदळून थेट शेतात जाऊन पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की त्यात फॉर्च्युनर गाडी चक्काचूर होऊन त्यातील प्रवासी सौ भावना भरत सुपे वय ४५ हे जागीच ठार झाली असून चालक कृष्णा सुपे, विद्या काशिनाथ सुपे, तसेच टाटा इंडिका मधील व्ही एस विद्यालयाचे नाईक विद्यालयाचे चेअरमन परिवारातील रेखा हेमंत नाही वय ४० प्रतीक हेमंत नाईक वय २० प्रीती हेमंत नाईक वय १८ रा. रावेर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी फैजपूर व जळगांव येथे हलवण्यात आलेले आहे.
सदरील भीषण अपघाताला जबाबदार धरून सावदा पोलिस स्टेशनात फॉर्च्युनर कार चालक कृष्णा भरत सुपे यांच्याविरुद्ध गुरनं.१२१/२०२१ भांदवीचे कलम ३०४ (अ) २७९,३३७,३३८, मोटर वाहन कायद्यांतर्गत कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील फिर्याद योगीराज किसन महाजन यांनी दिली असून पुढील तपास एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहे






