Jalgaon

मृत आईच्या दागिन्यांवरून भावांमध्ये वाद ; यावल पोलिसात गुन्हा दाखल

मृत आईच्या दागिन्यांवरून भावांमध्ये वाद ; यावल पोलिसात गुन्हा दाखल

रजनीकांत पाटील

सांगवी खुर्द येथील राहणार्‍या कुसुमबाई तायडे यांचे दिनांक २ जुन रोजी निधन झाले. मृत झालेल्या आईच्या अंगावरील दागिने काढल्यावरून झालेल्या वादातून दोन भावांमध्ये वाद होऊन यात एकाला मारहाण झाल्यामुळे पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सांगवी खुर्द येथील राहणार्‍या कुसुमबाई तायडे यांचे दिनांक २ जुन रोजी निधन झाले. तेव्हा रात्री बाराच्या सुमारास अशोक मुरलीधर तायडे यांची आत्या जनाबाई एकनाथ गाडे यांच्या घरासमोर अशोक मुरलीधर तायडे व शंकर मुरलीधर तायडे या दोघ भावां मध्ये मयत झालेल्या कुसुमताई तायडे यांच्या अंगावरील दागीने वाटणीवरून वाद झाला.
यात शंकर मुरलीधर तायडे यांनी गजानन एकनाथ गाडे राहणार सांगवी खुर्द तालुका यावल यांच्यात शाब्दीक चकमक झाली. यानंतर शंकर मुरलीधर तायडे व गजानन एकनाथ गाडे यांनी दोघांनी मिळुन अशोक तायडे यांना लोखंडी डंबेल्सने कपाळावर पाठीवर आणि उजव्या हातावर मारहाण करून गंभीर दुखापत केली.
याबाबत अशोक मुरलीधर तायडे यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केली असुन विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button