प्रतिनिध विक्की खोकरे
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आज सफाई कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना या शाखेच्या उद्घाटन संघटनाचे संस्थापक राज्यध्यक्ष नागेज कंडारे यांच्या हस्ते करण्यात आले व त्याचा अध्यक्षतेखाली सर्व सफाई कामगारांची चर्चा बैठक घेऊन त्याचा समस्या जाणून घेतल्या या बैठकीत अमरावती जिल्हाध्यक्ष रवींद्र उसरे, विदर्भ प्रमुख प्रशांत नकवाल, मिडिया प्रसिद्ध प्रमुख युवराज खोकरे, यवतमाळ जिल्हाउपाध्यक्ष संतोष पवार आदी मान्यवर सह शेकडो सफाई कर्मचारी उपस्थित होते
सफाई कामगारांच्या कंत्राटी कामगारांच्या होणार्या आर्थिक पिळवणूक व त्यांच्या समस्या याविषयी अनेक कामगारांनी आपली व्यथा मांडली यावर कायदेशीर माहीती व शासनाच्या योजना राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांनी दिली.
बैठकीनंतर राज्याध्यक्ष कंडारे यांनी शिष्टमंडळासह मुख्याधिकारी श्री डॉ प्रशांत जाधव यांची भेट घेऊन त्यांना कंत्राटी कामगारांच्या समस्या यांची जाणीव करून दिली व होणाऱ्या पिळवणुकीचा पासून त्यांची मुक्तता करावी अशी सूचना केल्या यावर मुख्याधिकारी जाधव यांनी लवकरच एका बैठकीचे आयोजन करून सदर सर्व समस्या सोडवण्याची हमी दिली.







