जागतिक आदिवासी अधिकार दिनासाठी ६०० जण म्हैसूर रवाना
प्रतिनिधी नाशिक
आदिवासी समन्वय मंच भारत विविध आदिवासी संघटनातर्फे १३ वा जागतिक आदिवासी अधिकार दिन म्हैसूर (कर्नाटक) येथे १२ व १३ सप्टेंबरला होणार आहे यासाठी नाशिकमधून सामाजिक, साहित्यक, कलावंत, पथकासह ६०० कार्यकर्ते मंगळवारी स्वर्ण जयंती एक्सप्रेसने व इतर आदिवासी कार्यकर्ते बुधवारी खाजगी बसने जात आहेत.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेने १३ सप्टेंबर २००७ रोजी आदिवासींच्या संरक्षणासाठी ४६ कलमी अधिकार घोषणापत्र तयार करण्यात आले. या घोषणापत्रात आदिवासींचे अस्तित्व, हक्क, अधिकार आणि विकासातील सातत्य बघता आदिवासींचे अधिकार काय आहे याबाबतीत भारतात खूपच अज्ञान आहे. यासाठीच सर्व संघटनांनी एकत्र येत आदिवासी समन्वय मंचची स्थापना केली आहे. कार्यक्रमास आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल यांच्या नेतृत्वाखाली ६०० आदिवासी कार्यकर्ते मंगळवारी सकाळी रवाना झाले यात किसन ठाकरे, रावण चौरे, मांगीलाल गांगुर्डे, चेतन खंबाईत, प्रदिप इंफाळ, राजु कवर, सुशिल कुवर, मनोहर गायकवाड, व बेधडक रोखठोक आदिवासी संघाचे आप. पंकज चौधरी कोकणी, आप. प्रमोद गायकवाड यांचा समावेश आहे.







