अमळनेर:शहरातील लव्ह लफाटा नियंत्रित करण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती..!असा साधा संपर्क..
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा जयश्री दाभाडे यांनी 8 सप्टेंबर रोजी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत कागदावर असलेल्या निर्भया पथकाला कार्यान्वित करण्याची मागणी केली होती.
अमळनेर गेल्या काही महिन्यांपासून अमळनेर तालुक्यातील वातावरण अत्यन्त खराब झाले असून अल्पवयीन आणि इतर मुलींच्या पळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे आतापर्यंत साधारण पणे 35 ते 40 मुली पालकांना गुंगारा देऊन रफू चक्कर झाल्या आहेत. यातील काही परत आल्या तर काही अजूनही सापडल्या नाहीत.एकूणच या सर्व प्रकारात सामाजिक शांतता तसेच मुली महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपासून कोरोना मुळे ऑनलाइन शिक्षणासाठी सर्व मुला मुलींना मोबाईल देणे आवश्यक झाले आहे. पण त्याचा गैरवापर होताना स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रेमविवाह करणे हे गैर नसले तरी ज्या वयात मुला मुलींनी शिक्षण करियरकिंवा भावी आयुष्याचा विचार करणे आवश्यक आहे अश्या काळात प्रेम करून पळून जाण्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी यापथकाने आपला झटका दाखविला आहे. प्रताप महाविद्यालयात शिकत असलेल्या फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला एका मुलासोबत रंगेहाथ पकडून पोलीस ठाण्यात नेऊन चांगलाच इंगा दाखविला आहे.तर त्या विद्यार्थीनीला मदत करणाऱ्या मैत्रीणीलाही दणका दिला आहे. दामिनी पथकाच्या नियुक्ती नंतर
पहिल्याच दिवशी नम्रता जरे व रेखा ईशी या दोन्ही महिला पोलीस भगिनींनी उत्तम कामगिरी दाखवत महिला कोणा पेक्षा कमी नाहीत हे सिद्ध केले आहे. या कामगिरीमुळे तरुण तरुणींचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागा,ढेकू कार्यालयाजवळ बुधवारी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुली एका तरुणाची वाट पाहत उभ्या होत्या. थोड्या वेळाने एक तरुण त्याच्या दुचाकीने तेथे
पोहचला. त्यानंतर ते सर्व टेकडीवर गेले.टेकडीवर प्रेमालाप सुरू असताना दुसरी तरुणी लक्ष ठेवून होती.या प्रकाराची माहिती दामिनी पथकाला माहिती मिळताच तत्काळ नम्रता जरे आणि रेखा ईशी या महिला पोलिस तेथे पोहचल्या.सदर तरुण तरुणींना पोलीस ठाण्यात नेऊन समज देण्यात आली.
तरी वरील सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी अमळनेरात दामिनी पथकाची नियुक्ती शाळकरी मुलींना काॕलेज मुलींना कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर रेखा ईशी – 90110 79833 व नम्रता जरे 97642 19000 यांच्याशी संपर्क करावा.






