Kolhapur

रणजितसिंह पाटील यांच्या पाठिब्यांमुळे राजे समरजितसिंहना मिळाले हत्तीच बळ.

रणजितसिंह पाटील यांच्या पाठिब्यांमुळे राजे समरजितसिंहना मिळाले हत्तीच बळ.

सुभाष भोसले-कोल्हापूर

गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक,ज्येष्ठ नेते रणजितसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांना आपला पाठिंबा मुरगूड येथे हजारो कार्यकर्त्याच्या मेळाव्यात जाहीर केला.रणजितसिंह पाटील गट कोणाला पाठिंबा देणार ,याची चर्चा सपूंर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चालू असतानाच राजेना दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांना या निवडणूकीत हत्तीच बळ मिळालं आहे.रणजितदादा मेळाव्याला उद्देशुन म्हणाले की,गेले 40 वर्ष ते महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत.राजे समरजितसिंह घाटगे हे उच्यविदयाविभूषीत उमदे नेतृत्व असून त्यांची कार्यक्षमता प्रचंड आहे.ते कागलच्या समाजकारण, राजकारण यात सक्रिय असून ते तरूण आहेत.त्यांनी म्हाडाचे सभापती म्हणून काम केलेले आहे.पुढे 20 ते 25 वर्ष ते तालुक्याचा विकास करू शकतात.त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्याच्यां आग्रहास्तव राजेंना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेतला. राजे समरजित घाटगे यांनी या निमित्ताने आभार मानले.ते म्हणाले की,दादांच्या या पाठिंब्यामुळे मला कागल मतदारसंघात खूप मोठ बळ मिळाल आहे.जनतेची सेवा करण्याची मला एकदा संधी दया असे भावनिक आवाहन त्यांनी केले यावेळी पाटील गटाचे व दादांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थीत होते.
या मेळाव्याला अध्यक्ष बाळूअण्णा पाटील ,युवा नेते पद्मसिंह पाटील ,विश्वजितसिंह पाटील, सखाराम डेळेकर,बिद्रीचे संचालक सुनिल सूर्यवंशी,
दत्तात्रय खराडे, दत्ताञय जाधव,रघुनाथ कुंभार,वाळव्याचे भूषण पाटील,बाजीराव गोते,एकनाथ कळमकर,प्रदिप चौगुले,माजी उपधनगराध्यक्ष बंजरंग सोनुले,अशोक खंडागळे,संतोष वंडकर,दगडू शेणवी ,सुनिल जाधव ,महादेव भिऊंगडे व हजारो कायकर्ते महिला उपस्थीत होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button