जळगांव जिल्ह्यात आज पुन्हा 217 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रुग्णसंख्या अठ्ठेचाळीसशेच्या पार
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
जळगाव जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 217 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज 111 रुग्ण देखील झाले असून आतापर्यंत 2828 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 92, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, जळगाव ग्रामीण 11, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, बोदवड 15, दुसर्या जिल्ह्यातील 1 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4803 इतकी झाली आहे. आज 11रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.






