जिल्ह्यातील कोविड-१९ बाधितांचे वाढते गांभिर्य लक्षात घेता रेमडीसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन(O2) तातडीने उपलब्धता करा – खा.डॉ.भारती पवार
सुनील घूमरे नाशिक
नाशिक : महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये कोविड-19 या आजाराने बाधित सर्वाधिक रूग्ण आहे. नाशिक जिल्ह्यातील गावागावात कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन बाधित रूग्णांची प्रकृती अपुऱ्या उपाययोजनांच्या अभावामुळे चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना अतिशय गरजेच्या असणाऱ्या रेमडीसिवर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या(O2) कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या गंभिर परिस्थितीत बाधित रूग्णांना उचित उपचार मिळावा याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी तातडीने रेमडीसिवर इंजेक्शन व ओक्सिजांचा(O2) मुबलकसाठा उपलब्ध व्हावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचेकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून जिल्ह्यातील तालुका ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करा – खा.डॉ.भारती पवार
जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत देखील लाक्षणिय वाढत होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेवुन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रुग्णालयांVना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करणेकामी योग्य ते नियोजन करण्याच्या खा.डॉ.भारती पवार यांनी सूचना केल्या.
जिल्हा ग्रामिण रूग्णालय नाशिक येथे ग्रामिण भागातील रूग्णांसाठी अतिरिक्त ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा – खा.डॉ.भारती पवार
नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्हा ग्रामिण रूग्णालयातील रूग्णांसाठी असलेले बेड अपुरे पडत आहेत. ग्रामिण भागातुन शहरात येणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढत असल्याने त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्हा ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजन बेडची अधिक वाढ करून तातडीने व्यवस्था करावी व त्याचे योग्य ते नियोजन करण्यात यावे जेणेकरून ग्रामिण भागातुन येणाऱ्या रूग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल व त्यांना वेळेवर योग्य तो उपचार देखील मिळण्यास मदत होईल याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन सूचना केल्या आहेत.






