लोकनियुक्त सरपंचाचे गैरहजेरीत मोठा वाघोदा कोरोनामुक्त झालेच पण प्रभारी ग्रामसेवकही दांडी बहाद्दरच
प्रतिनिधी मुबारक तडवी
बेजबाबदार लोकनियुक्त सरपंच, यांचा कामचुकारपणा कर्तव्यात कसूर स्पष्ट दिसुनही जिल्हाधिकारीं प्रशासन कारवाईचा मुहूर्त शोधताय का ? सरपंच यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हाधिकारी यांची कार्यवाहीस दिरंगाई का*
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा या १७ सदस्यिय ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आहेत जगात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातलेले असताना शासनाने लॉकडाऊंन केले जनजिवन भयभीत झाले याचं ऐन कसोटीत लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीला दांडी मारत दुर्लक्ष केलेले आहे व आपला वाघोदा गावातील रहिवासही सोडला व आपला निवास यावल तालुक्यातील अकलूज ( भुसावळ) येथे करुन मोठा वाघोदा वासीयांना संकटकाळी धीर देण्याऐवजी उपाय योजना सोई सुविधा उपलब्ध करण्या ऐवजी गावाच सोडून इतर तालुक्यातील निवासी झालेले आहेत व ग्रामपंचायतीकडे ही त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांचेवर कार्यालयीन कामकाजाचा ताण वाढला व तो असह्य झाल्यामुळे अर्जित सुट्टी घेत त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला पण मोठा वाघोदा वासियांचा जीवच धोक्यात टाकीत या महाशयांनी त्यांच्या बेजबाबदारपणाचा कळसच गाठला कर्तव्यात कसूर,कर्मशुन्यतासह जबाबदारी झटकत जाणूनबुजून हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत गावकर्याना जिवनमरणाच्या दारात आणून उभं केलं आहे आणि कोरोनामुक्त गावास कोरोना ग्रस्त करणेस कारणीभुत ठरले व पुढील अनर्थास ही पात्र ठरलेत मोठा वाघोदा गावात कोरोना पॉझिटिव्ह दोन मयतांसह ११ संक्रमित रुग्ण आढळले होते मात्र आरोग्य प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली व या सक्षम उपाययोजना आणि आवश्यक औषधोपचार करीत या ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह करीत संपूर्ण गाव दि.२४ जून रोजी या कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देत आरोग्य विभागातर्फे गांव कोरोनामुक्त जाहीर केले मात्र गावकर्यानी सरपंचासह ग्रामविकास अधिकारी यांनी खेचत नेलेल्या जिवनमरणाच्या दारात आणुन सोडले असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी वारंवार करूनही संबंधित प्रशासनाकडून काही एक कारवाई केली गेली नाही मोठा वाघोद्यात कोरोना महामारीचा विस्फोट झाला तरीही लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांकडे पाठ फिरवत फिरकूनही बघितले नाही नियुक्त ग्रामविकास अधिकारी यांनी दांडी बहाद्दर लोकनियुक्त सरपंच यांच्या गैरहजेरीला कंटाळत २ महिन्याची सुट्टी घेतली तर संकटकाळी कार्यालयीन कामकाज चालविण्यासाठी गटविकास अधिकारी रावेर यांनी तात्पुरते ग्रामसेवक नियुक्त केले त्यात मनमर्जी तील अधिकारी न मिळाल्याने बदलीवर बदलीचा खेळ रंगला ६ दिवसांत ३र्या ग्रामसेवकांनी पदभार स्वीकारला मात्र त्यांची गहुखेडा ग्रामपंचायत ला नियुक्ती असल्याने मोठा वाघोदा ग्रामपंचायती कडे सरपंच सह ग्रामसेवक यांनीही दुर्लक्ष केल्याने पुन्हा गावात कोरोना संकट प्रवेशाची लक्षणं दिसत आहेत तरी जळगांव जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी फैजपूर, तहसिलदार, गटविकास अधिकारी रावेर हे या प्रकरणी गांभीर्य घेतील का? तसेच वारंवार तक्रार करूनही कारवाई करण्यास का ? येथील ग्रामपंचायतीचे सदस्य मुबारक तडवी यांनी जळगांव जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल करुनही कारवाई स दिरंगाई का ? यांसह मुदत संपुनही लोकनियुक्त सरपंच यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने जिल्हाधिकारी जळगांव त्यांना अपात्र करतील का ?असे ऐकना अनेक प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह ग्रामस्थांतून उपस्थित होत आहेत






