Kolhapur

कागलमध्ये ग्लोबल टीचर रणजीतसिंह डीसले यांचा सत्कार,डीसले सरांचे कार्य समाजाला आदर्शवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन…..

कागलमध्ये ग्लोबल टीचर रणजीतसिंह डीसले यांचा सत्कार,डीसले सरांचे कार्य समाजाला आदर्शवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन…..

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : शाळा समृद्ध झाल्या तरच गावे समृद्ध होतील. त्यासाठी शिक्षकांनी ग्लोबल टीचर रणजितसिंह डीसले यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कागलमध्ये शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुरुवातीला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डीसले यांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा कल वाढून, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचीही पालकांची तयारी आहे. म्हणूनच कॉन्व्हेंटच्या दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदांच्या शाळांमधून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या तोडीस – तोड जिल्हा परिषदेच्या शाळाही केल्या पाहिजेत.आपले मुल आय.ए.एस, आय.पी.एस, आय.एफ.एस, आय.आर.एस या सेवांमध्ये गेले पाहिजे, तसेच परदेशातही उच्चपदावर गेले पाहिजे ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी, शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला आपले मूल म्हणून शिकवा व त्याला प्रगतीपथावर पोहोचवा असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले. इंग्रजी शिक्षणाच्या स्पर्धेत टिकाव लागणायासाठी प्रत्येक शाळेला एक डिजिटल शिक्षक देण्याचीही गरज बनली आहे.

— डीसले गुरुजी पोहोचणार राज्यभर
—————————————-
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, श्री. डीसले यांची राज्यभर फिरून शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची तयारी आहे. प्रतिनियुक्तीवर त्यांची तशी लवकरच नियुक्ती केली जाईल. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील शिक्षकांना व्हावा, यासाठी ते फिरुन राज्यभर मार्गदर्शन करतील. त्यांना त्यासाठी सर्व त्या सोयी सुविधाही पुरविल्या जातील. ग्रामविकास विभागाच्या वतीने आठवड्यातच तसा आदेश काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ग्लोबल टीचर रणजितसिंह डीसले म्हणाले की,शिक्षकांनी बदलत्या काळानुसार व शैक्षणिक प्रवाहाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे.शिक्षणातील जुन्या रूढी व परंपरा पुसून तंत्रज्ञानाचा वापर करावा. शिक्षकांनी संशोधन वृत्ती जोपासावी.शिक्षणामध्ये विध्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून शिक्षकांनी अध्यापन करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. अमरीशसिंह घाटगे,जिल्हा परिषद सदस्य मा.युवराज पाटील शिक्षण सभापती मा. प्रवीण यादव, के.डी.सी.सी बँकेचे संचालक मा.प्रताप उर्फ भैय्या माने,मुख्य कार्यकारी अधिकारी मा.संजयसिंह चव्हाण, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर , विस्तार अधिकारी श्री रामचंद्र गावडे ,सौ सारीका कासोटे,व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कागलमध्ये ग्लोबल टीचर रणजीतसिंह डीसले यांचा सत्कार,डीसले सरांचे कार्य समाजाला आदर्शवत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.....

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button