सर्वसामान्य आदिवासी शिक्षिका ते देशाच्या द्वितीय महिला राष्ट्रपती होण्याचा मान! आदिवासी समाजात आनंदाची लहर
उदय वायकोळे चांदवड
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूदे शातील सर्वात दुर्लक्षित आदिवासी समुदायातून व विशेषतः एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतेय याचा विशेष अभिमान देशातील जनतेला होत आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताच्या सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती पदी प्रचंड बहुमताने श्रीमती द्रौपदी मुर्मू निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने चांदवड येथे आंनद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवीहट्टी ( रेणुका नगर ), लेंडीहट्टी येथे आदिवासी बांधवांच्या समवेत फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बाळासाहेब वाघ, शहरअध्यक्ष प्रशांत ठाकरे, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष संजय पाडवी , मुन्ना मोरे, महेश खंदारे, महेंद्र कर्डीले , रवींद्र खरोटे, किशोर क्षत्रिय, शेखर घोडके,महेश बो-हाडे , तुषार झारोळे, विशाल ललवाणी, संजय क्षत्रिय, अतुल चौबे , अरुण बिरारी , अंकुर कासलीवाल, संजय चौबे, कैलास गुंजाळ, रूपेश पवार , मच्छिंद्र गांगुर्डे , मंगेश गोधडे , निलेश गुजराथी , उदय वायकोळे , विकास घुले, मनोज बांगरे , शिवाजी गवळी , सागर बडोदे आणि आदिवासी बॉईज गृपचे असंख्य कार्यकर्ते व आदिवासी महिलांनी आनंदोत्सवात सहभाग नोंदवला तसेच चांदवड तालुक्यातील व शहरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






