गडचांदुरात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेची निर्मिती करा
मनोज गोरे कोपरना
कोपरना : ग्रामीण भागातिल गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून परिसरांचे नाव उंचावता येईल ह्या हेतुतून हिंदूहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या जयंतीनिमित्त गडचांदूर, शहरात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका उभारावी असे साकडे आमदार सुभाष धोटे यांचेकडे गडचांदुरातील (व्ही कॅन) वाइल्डलाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाऊंडेशन कडुन घालण्यात आले.
गडचांदुर शहर दोन तालुक्यातील मध्यभागी असल्याने कोरपना जिवती तालुक्यातील गावांना जोडणारी मोठी बाजारपेठ आणि शैक्षणिक संस्था असणारे शहर असून दोन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेत रुची असतांना सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढे जाणे शक्य नसते अश्या होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य उंचावण्याकरिता गडचांदुर शहरात अभ्यासिकेची अत्यंत गरज असून शहरात भव्य अभ्यासिका उभारावी असे साकडे व्ही कॅन फौंडेशन गडचांदूर कडून राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे यांना निवेदनातून घालण्यात आले. आमदार सुभाष धोटे यांनी लवकर शहरात अभ्यासिका उभारू असे आश्वासन दिले. यावेळी फौंडेशन चे प्रिंतेष मत्ते, अरविंद मेश्राम, राकेश गोरे,पुरुषोत्तम निब्रड,प्रेम बुऱ्हाण ,दिपक खेकारे इतर सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
पुणे मुंबई नागपूर अश्या मोठ्या शहरात जाऊन अभ्यासक्रम घेणे शक्य नसलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासिका सोन्याची किरणे घेऊन येणार असून ग्रामीण भागातिल विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होऊन आई वडिलांचे स्वप्ने पूर्ण करण्याची सुवर्ण संधी घेऊन येणार आहे.
गडचांदूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका निर्मितीसाठी
लवकरचं निधी ची तरतूद करून भव्य अभ्यासिका उभारू ,,
सुभाष धोटे
आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र
,,,,,,,,,,,
फोटो,,,






