sawada

स्थानिक विज वितरण मुळे सावदयात लाक डाउन चा फज्जा वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ

स्थानिक विज वितरण मुळे सावदयात लाक डाउन चा फज्जा

वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सविस्तर वृत्त असे कि ही बाब सर्वांना कडून चुकलेली आहे की संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणु चा संसर्गाने हाहाकार माजवला आहे या संकट काळात जनता चारही बाजूने त्रस्त असुन या मध्ये सावदा व परिसरात दिवसा व रात्री बेरात्री केव्हा ही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ मुळे नागरिकांच्या समस्यात आणखीनच भर पडत आहे.
कदाचित आज 03/05/2020 रोजी काही बिगाड झाल्या मुळे की काय विज पुरवठा खंडित झाला असावा. परंतु सध्या तिव्र उन्हाळा असल्याने त्रस्त नागरिकांना विज पुरवठा खंडित झाल्या वर नाईलाजाने घरा बाहेर पडल्या शिवाय कोणताच दुसरा पर्याय नसतो. परिणामी नागरीक घरा बाहेर पडुन थेट वाटेल त्या ठिकाणी संख्याने टोलके जमवून उभे राहतात व बसतात. तसेच रसत्या वर फिरतात. सबब या मुळे लाक डाउन चा फजजा उडीत आहे.त्यात आपले कर्तव्य बजावित असलेल्या पोलिस त्यांना दंडुके दाखवून परिणामी घरात जाण्यास भाग पाडतात. हा वेगळा विषय
या काळात तिव्र उन्हाळ्यात मुस्लिम बांधवांचा सुध्दा पवित्र रमजान महीना सुरू असुन मोठ्या संख्यात रोजदारा सह सर्व नागरिकांना वारं वार विज पुरवठा खंडित होत असल्याने मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
विज वितरण चया या उदार व असंवेदनशिल पणया मुळे नागरीकात मोठ्या प्रमाणात रोष असुन ते उघड पणे बोलुन दाखवतात. या तिव्र उन्हाळ्याच्या दिवसात विज पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी विज वितरण ने आपल्या कर्तव्य ची जाणिव ठेऊन या साठी कायम चा ठोस उपाय करणे त्यांना गर्जेचे वाटत नाही का?. हा यक्ष प्रश्न सर्वांनाच भेळसावत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button