Amalner: महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रियदर्शनी भोसले यांना जाहीर..!
अमळनेर अनाथ, अंध, अपंग यांच्यासाठी झटणाऱ्या अमळनेरच्या प्रियदर्शनी एकनाथ भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र बँकेत १२ वर्षांपासून रोखपाल पदावर कार्यरत भोसले या अमळनेर येथील महाराष्ट्र बँकेत १२ वर्षांपासून रोखपाल पदावर कार्यरत आहेत. बँकेत कार्य करत असताना त्यांनी अनाथ, अंध, अपंग यांच्यासाठी केलेली मदत त्यांना दिलेले सहकार्य या अनुषंगाने
महाराष्ट्र शासनातर्फे कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येते. याच कार्यासाठी राज्यातील ५१ कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अमळनेरच्या प्रियदर्शनी एकनाथ भोसले यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये अंशदान जमा करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी १९७९ पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. खान्देशातील धुळे, जळगाव, भुसावळ, जामनेर तर अमळनेरच्या प्रियदर्शनी भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रियदर्शनी भोसले या प्रताप महाविद्यालयातील प्रा.योगेश तोरवणे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






