Maharashtra

९ एप्रिल रोजी शब ए बरात ची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी

प्रतिनिधी नुरखान

अमळनेर येथील ९ एप्रिल रोजी शब ए बरात ची नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी आप आपल्या घरीच अदा करावी असे आव्हान शहरवासीयांना ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटी च्या वतीने करण्यात आले.

शहर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमेटी च्या तर्फे नुकतेच एक पत्रक काढण्यात आला या पत्रकात म्हटले आहे की कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे त्यासाठी दि ९ एप्रिल गुरुवार रोजी येणाऱ्या शब ए बरातसाठी मुस्लिम धर्मियांनी घराबाहेर पडू नये कब्रस्तान मध्ये येवून प्रार्थना करता काम नये तसेच शब ए बरातची नमाज मशिदीत देखील अदा करू नये शहरातील व जिल्ह्य़ातील मुस्लिम बांधव सुज्ञ आहेत यापूर्वी ही दोन शुक्रवार ( जुम्मा ) ची नमाज घरी बसूनच अदा केली आहे व शब ऐ मेराज सुध्दा घरातच साजरी करण्यात आली आहे म्हणून शब ए बरात ची सुद्धा घरीच प्रार्थना करतील व एकजुटीने शहाणपणाने घरातच थांबून कोरोनाच संकट परतुन लावतील व राष्ट्राच्या सुरक्षिततेला सहकार्य करतील असा निर्धार यावेळी करण्यात आले असे लेखी पत्रक द्वारे सर्व शहरातील मुस्लिम बांधवांना ईदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button