Nashik

Nashik: आरोपीला फाशी द्या..दिलीप पेंढारी

आरोपीला फाशी द्या..दिलीप पेंढारी

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील
म्हेलुस्के:-येथील- कु.अबोली विजय सुतार (वय ७ वर्षे ) रा. रुवले (सुतारवाडी) ता. कराड, जि सातारा, या निरागस सात वर्षाच्या चिमुकलीवर, 45 वर्षाच्या संतोष थोरात या नराधमाने बलात्कार करून अमानुषपणे मुलीची हत्या केली. व त्या निरागस चिमुकलीला जंगलात फेकून दिले.या संदर्भात सदर आरोपीला तात्काळ अटक झाली आहे. परंतु हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, खरेतर त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी. या मागणीसाठी सुतारसमाजाचे बाराबुलतेदार संघाचे राज्यअध्यक्ष दिलीपराव पेंढारी, जिल्हाध्यक्ष बापू तासकर, रमेश जाधव, सुनील आव्हाड,राजेंद्र भालेराव,योगेश सिरसाट,संदीप सिरसाट, पत्रकार बापू चव्हाण, नारायण राजगुरू, शांताराम पगार, राजू सोनवणे, वसंतराव पगार, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष तौशिक मनियार यांच्यासह अनेक समाज बांधव (कोरूनाचे नियम पाळून) उपस्थित राहुन दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, व दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सर्व समाजबांधव यांनी अत्यंत भावनीक होऊन, सदर आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी विनंती करण्यात आली. यावेळी तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांनी सर्वांना दिलासा दिला व हे निवेदन लगेचच महाराष्ट्रराज्य मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे तात्काळ पाठवण्याची तयारी दर्शविली. यावेळी समाजबांधव (कोरोनाचे नियम पाळून) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button