Khirdi

विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांनी केली अटक..

विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांनी केली अटक..

(स्थानिक गुन्हे व निंभोरा पोलिसांची संयुक्त कारवाई)

खिर्डी/प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे

रावेर ते सावदा रोड वरील वडगाव गावाजवळ विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व निंभोरा पोलिसांनि एकास अटक करून कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना गुप्त बातमी मिळाल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, हे कॉ रमेश चौधरी ,हे कॉ अनिल इंगळे, पो.ना .संतोष मायकल, पोलिस चालक मुरलीधर बाऱ्हे तसेच निंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि महेश जानकर ,हे कॉ राकेश वराडे,पो.ना.ईश्वर चह्वाण ,पो.ना.अनिल साळूंखे,पोलिस चालक सादिक शेख वजीर यांनी संयुक्त पणे सापळा रचून रावेर ते सावदा रोड दरम्यान वडगाव गावांजवळ दि.११ आक्टोंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून १० मि सुमारास आरोपी तंझीम बेग नसीम बेग मिरजा वय ३१ राहणार तांबापुर जळगाव यांच्या कडे विना परवाना पंधरा हजार किमतीचा गावठी कट्टा बाळगतांना मिळून आल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी व निंभोरा पोलिसांनी त्यास अटक करून त्यांच्या विरूद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात भाग ६ गु र नँ १९/२०२० शस्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे .आरोपीस रावेर न्यायालयात हजर केले असता त्यास दि.१४ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सपोनि महेश जानकर हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button