मंगरूळ सरपंचचे पतीची “मग्रुरी “आणि “खंडणी बहादूर” पत्रकाराची करामत उघडकीस
मंगरूळ अमळनेर येथील रहिवासी जगदीश लोटन चौधरी यांनी केलेल्या तक्रारी नुसार जिल्हा परिषद जळगांव यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांना मंगरूळ सरपंच हर्षदा पाटील यांचे पती संदीप पाटील आणि खंडणी बहादूर पत्रकार यांच्यावर कलम 385,500,188 इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती अशी की मंगरूळ येथील रहिवासी जगदीश लोटन चौधरी यांनी जिल्हा परिषद जळगांव यांना दि 27 जुलै 2019 रोजी मा सी इ ओ यांच्या खोट्या आदेशाची बतावणी करून खोटे बातमीपत्र छापून व्यावसायिक जगदीश चौधरी यांचे कडून खंडणी मागणी केल्याचा आरोप केला आहे.याविषयी चौकशी करून चौकशी अंती संबंधित दोषी आढळुन आल्यास फौजदारी गुन्हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 प्रमाणे प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सदर चौकशी चा अहवाल जिल्हा परिषद कडे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.आवश्यक दस्त ऐवज आणि पुराव्यासह अहवाल दाखल करणे आवश्यक आहे.







