Amalner

Amalner: नदीत बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांची पार्थिवं १० दिवसांनी पालकांच्या ताब्यात..अश्रूंचा महापूर आणि अंतिम बिदाई…

Amalner: नदीत बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांची पार्थिवं १० दिवसांनी पालकांच्या ताब्यात..अश्रूंचा महापूर आणि अंतिम बिदाईला उसळला जनसागर..

अमळनेर रशियातील वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जिया पिंजारी व जिशान पिंजारी या आत्ते-मामे भावंडांचा, तर भडगाव येथील हर्षल देसले या विद्यार्थ्याचा समावेश आहे.रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चार भारतीय विद्यार्थ्यांचा चार जून रोजी वोल्खोव्ह नदीत बुडून मृत्यू झाला होता. दहा दिवसांनी या मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतातील त्यांच्या मूळ गावी दाखल झाले आहेत. मृतांपैकी दोघा भावंडांवर मुस्लीम रिवाजाप्रमाणे, तर एका विद्यार्थ्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसमुदाय उसळला होता. या घटनेने समाजमन देखील सुन्न झाले होते. अमळनेर येथील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान आजच जिशान च्या वडिलांचा वाढदिवस असून आजच्या दिवशीच आपल्या पोटच्या मुलाचा अंतिम संस्कार करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. जिशान चे वडील अशपाक पिंजारी हे एक सधन व यशस्वी शेतकरी आहेत. त्यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलगा काही क्षणात दिसेनासा झाला सर्व स्वप्न धुळीला मिळाली.

यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी सोमवारी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती. मॉस्कोहून विमानाने दुबईमार्गे मुंबईला चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह आणुन त्यानंतर मुंबई, जळगाव आणि अमळनेर असे हे मृतदेह आणण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button