Maharashtra

पती-पत्नी एकमेकांचा आधार– परमपूज्य कृष्णकृपा प्रेममूर्ती

पती-पत्नी एकमेकांचा आधार– परमपूज्य कृष्णकृपा प्रेममूर्ती

पती-पत्नी एकमेकांचा आधार-- परमपूज्य कृष्णकृपा प्रेममूर्ती

फैजपूर:प्रतिनिधी सलीम पिंजारी
      संसारात  पती पत्नी हा आयुष्यात एकमेकांचा भक्कम आधार असून या आधाराला तडा जाऊ नये असे दोघांनी एकमेकांशी वागावे असे येथील रथ गल्लीतील संगीतमय रासलीला व नृत्य पात्रासहित श्रीमद् भागवत कथेच्या निरुपणावेळी हरिभक्त परायण  कृष्णकृपा प्रेम मूर्ती श्री दिलीप जी महाराज वृंदावन धाम यांनी सांगितले.  दिनांक २० ऑगस्ट ते 2२६ ऑगस्ट या दरम्यान दररोज रात्री आठ ते अकरा या वेळेत श्रीमद् भागवत कथा पारायण सुरू आहे. या कथेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली आहे. त्यांनी कथेच्या तिसऱ्या दिवशी च्या निरुपणात सांगितले की,  या कलियुगामध्ये सत्याची परीक्षा होते मात्र प्रत्येकाने चांगले वर्तन, चांगले विचार, चांगले आचार अंगीकारून मनुष्य जन्माचे सार्थक करावे. या संगीतमय भागवत कथेत सजीव देखाव्याने कार्यक्रमास रंगत येत आहे. गायक व बुलबुल वादक हभप मुकेश महाराज, तबलावादक हभप बाळू महाराज, सजीव देखाव्यासाठी हभप बाबामहाराज नृत्यकलेसाठी शुभम महाराज यांचेसह संत खुशाल महाराज ट्रस्टचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button