जळगाव जिल्हा दोनशे च्या उंबरठ्यावर अजून सहा रुग्ण बाधित… जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या झाली १९९
जळगाव :- कोरोनाचा कहर सुरूच जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 40 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. पैकी 34 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह तर सहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या सहाही व्यक्ती या जळगाव शहरातील असून यामध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.
यात 10 वर्षीय मुलगा, 22 व 24 वर्षाचा तरुण, 30 वर्षाचा पुरुष तर 30 व 38 वर्षीय महिलांचा समावेश. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 199 झाली. पैकी एकोणतीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या तर सत्तावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे






