Amalner

Amalner: माहिती अधिकार व पोलिस पत्रकार संरक्षण सेना जळगांव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सोनुभाऊ चौधरी यांचे खासदार व आमदारांच्या हस्ते सत्कार –

Amalner: माहिती अधिकार व पोलिस पत्रकार संरक्षण सेना जळगांव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सोनुभाऊ चौधरी यांचे खासदार व आमदारांच्या हस्ते सत्कार –

संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज सार्वजनिक सभागृह या नुतन वास्तुचा लोकार्पण सोहळा श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त दि.2 जानेवारी 2021 रविवारी रोजी कार्यक्रम मारवड येथे मोठ्या उत्सवात पार पडला यावेळेस सूत्रसंचालन प्रदीप चौधरी सरांनी केले व भाऊसो.सोनू भटू चौधरी यांची माहिती अधिकार व पोलिस पत्रकार संरक्षण सेना जळगांव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल खासदार उन्मेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून सोनू चौधरी यांचा सत्कार केला त्याप्रसंगी उपस्थित मा.आमदार शिरिष दादा चौधरी, मा.आमदार स्मिता ताई वाघ, मा.नगराध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक श्रीराम आबा चौधरी ( नगरसेवक अमळनेर ), मारवड सरपंच मा. उमेश साळुंखे, मा.संजय सुदाम चौधरी ( अध्यक्ष तेली समाज अमळनेर ), मा.आत्माराम चौधरी, लोटन जगन्नाथ चौधरी ( अध्यक्ष तेली समाज मारवड ) मा.पंकज पंडित चौधरी ( जिल्हा नियोजन समिती सदस्य जळगाव ), चैतन्य मनोज चौधरी (युवा अध्यक्ष तेली समाज अमळनेर), अविनाश मदन चौधरी अमळनेर व मारवड येथील तेली पंच मंडळ ,अमळनेर तेली पंच मंडळ व सर्व जिल्हास्थरावरून सोनू भाऊ चौधरी यांचे कौतुक केले,व त्यांच्या हातून जळगाव जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची सेवा घडावी ह्या सदिच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button