Amalner

कोव्हीड 19 चे कर्तव्य पार पाडत असताना मृत पोलीस पाटील यांच्या वारसास विमा रक्कम मिळावी..पोलीस पाटील संघटनेचे निवेदन..

कोव्हीड 19 चे कर्तव्य पार पाडत असताना मृत पोलीस पाटील यांच्या वारसास विमा रक्कम मिळावी..पोलीस पाटील संघटनेचे निवेदन..

कोविड19 अंतर्गत सेवा बजावत असतांना कोविड आजाराने मृत
झालेल्या पोलिस पाटील यांच्या वारसास रूपये 50 लाख विमाची रक्कम
मिळणेबाबत जळगांव पोलिस पाटील संघटना, जळगांव जिल्हा..विविध अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी..

अमळनेर नूरखान

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्राम स्तरीय कोराना समितीची स्थापना केली आहे. त्यात पोलीस पाटील हे कोविड समितीत सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. ही भूमिका बजवत असतांना जवखेडा ता. अमळनेर जि. जळगांव येथील पोलीस पाटील कै. उल्हास नामदेव लांडगे यांना कोराना विषाणूची लागण होवून त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला
आहे. तरी राज्य शासनाने कोराना समितीत काम करणाऱ्या समिती सदस्यास काम करित असतांना कोराना विषाणूची लागण होवून मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसास रूपये पन्नास लाखाचा विमा ( 50
लाख ) जाहीर केला आहे.
तरी शासनाने जाहीर केलेल्या विम्याची रक्कम ही जवखेडा ता. अमळनेर जि. जळगांव
येथील मयत पोलीस पाटील कै. उल्हास नामदेव लांडगे यांच्या वारसास रूपये 50 लाख (50लाख) वारसास मिळावी अशी मागणी आम्ही जळगांव जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, मा आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना देखील देण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button