Election Live: मी पुन्हा येईन.. हे वाक्य खरे होण्याची शक्यता…देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार..! अमळनेर 23 व्या फेरी अखेर विजयी अनिल पाटील..
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट झाले आहेत. यात महायुतीला मोठ्या प्रमाणात जनतेने पाठिंबा दिला आहे. एकूण 288 जागांपैकी 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. माविआ – 56, जागा आणि इतर- 7 जागांवर आघाडीवर आहेत. यात भाजप – 130, शिंदे गट- 56, अजित पवार- 39 काँग्रेस – 21, ठाकरे गट – 18, शरद पवार गट- 17, मनसे – 0 वंचित- 0 इतर – 7
दरम्यान मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या यावर सर्व समावेशक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
15- अमळनेर विधानसभा मतदार संघ
23 वी फेरी अखेर मिळालेली एकूण मते
1) अनिल भाईदास पाटील (महायुती) – 106649
2) शिरीष चौधरी (अपक्ष) – 75216
अनिल पाटील 32175 मतांनी विजयी






