विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराचे आमदार फारूक शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..
नंदुरबार फहीम शेख
१ डिसेम्बर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी धुळे शहराचे आमदार फारूक शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.
त्यात एम.आय.एम पक्षाचे धुळे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष, तसेच धुळे/नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवक व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत विधान परिषद निवडणुकीचे सर्वाधिकार आमदार फारूक शाह साहेब यांना देण्यात आले. या बैठकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष व आमदार साहेबांतर्फे व्हीप जारी करण्यात आले कि, जे नगर सेवक तसेच ज्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे त्यांनी पक्षाच्या आदेशा प्रमाणे निवडणुकीत मतदान करावे, जो कोणी पक्षाचा आदेश मानणार नाही अश्यांवर पक्षादेशाचा उल्लंघन केल्या बद्दल कारवाई करण्यात येईल असे व्हीप आमदार फारूक शाह यांच्या मार्फत जारी करण्यात आलेले आहे.
या वेळी पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शम्सुलहुदा शाह साहेब, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन साहेब, धुळे जिल्हा महासचिव शोएब मुल्ला, शहराध्यक्ष नूरा शेख , नंदुरबार शहर उपअध्यक्ष साजिद बागवान, शहादा तालुकाध्यक्ष साजिद पिंजारी, शहराध्यक्ष सद्दाम मंसूरी, सर्व गटनेते व नगर सेवक उपस्थित होते…






