Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र: चक्क तहसील आवारातून ट्रॅक्टर चोरीस..!

Amalner: चोऱ्यांचे सत्र: चक्क तहसील आवारातून ट्रॅक्टर चोरीस..!

अमळनेर तहसील कार्यालयात अवैद्य वाळू व गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर कारवाई करून उभे केले होते. हे ट्रॅक्टर चार जणांनी चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत असे की,शहरातील ग्रामीण भागातील तलाव, नाले व इतर ठिकाणाहून गौण
खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर एम एच 19 सि जे 1404 व ट्रॉली क्र. एम एच 19 / 5859 हे कारवाई करून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र दि. 28 रोजी सकाळी 2:30 वाजेच्या सुमारास चार जण तोंडाला रुमाल बांधून प्रवेशद्वार वर आडवे लावलेले शासकीय वाहन बाजूला करत सदर ट्रॅक्टर चोरून नेल्याचे दिसून येत असून त्या चार जनांपैकी संशयित एक जण ट्रॅक्टर मालक संदीप जगनाथ पारधी रा.जानवे ता. अमळनेर हा आहे. कोतवाल प्रवीण शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ट्रॅक्टर सह सुमारे 3 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चार जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात भादवी कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button