Amalner

गावाचा विकासाचे ध्येय ही परीवर्तनाची नांदी ! गटविकास अधिकारी सुभाष जाधव नवनिर्वाचित सरपंच ,सदस्यांचा सत्कार

गावाचा विकासाचे ध्येय ही परीवर्तनाची नांदी ! गटविकास अधिकारी सुभाष जाधव
नवनिर्वाचित सरपंच ,सदस्यांचा सत्कारकळमसरे ता.अमळनेर–
निवडणूक म्हटली की अंगात वारे आणि गावात कटुता याचा प्रत्यय मोठ्या प्रमाणात येतो .आणि वेळ व पैसा याचीही हानी होते.मात्र ज्यांनी निवडणूक बिनविरोध केली ,त्यांची खऱ्या अर्थाने आदर्श गावाची वाटचाल सुरू होते. आणि विकासाचे ध्येय जर लोकप्रतिनिधीनी ठेवले तर परिवर्तनाची नांदी आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही.असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी रणाईचे खुर्द ता.अमळनेर येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने नवनियुक्त सरपंच ,सदस्य यांचा सत्काराचा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
येथील गावात रणाईचे येथे तांड्यात प्रथमच रणाईचे खुर्द म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने येथील सर्व बंजारा समाज बांधवानी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सरपंच पदी प्रकाश चव्हाण,तर सदस्यपदी मिश्रीलाल बंजारा,राजू बंजारा,रामचंद्र चव्हाण,कलीबाई पवार,बालुबाई राठोड,कस्तुरा बंजारा, प्रिया बंजारा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.गावाचा विकासाचे ध्येय ही परीवर्तनाची नांदी ! गटविकास अधिकारी सुभाष जाधव नवनिर्वाचित सरपंच ,सदस्यांचा सत्कारयाप्रसंगी सत्काराचा कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील,पंचायत समितीच्या सभापती रेखा पाटील,गटविकास अधिकारी सुभाष जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम अहिरे, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट बी के सूर्यवंशी, प्रा.श्याम पवार,माजी सरपंच जी व्ही पाटील, मिलिंद पाटील,माजी नगराध्यक्ष दादा पवार,बाळासाहेब पाटील,भूषण पाटील,जिजाबराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
11-1लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा सुरू ठेवल्यास शासनाच्या योजना दारापर्यन्त असतात- गटविकास अधिकारी सुभाष जाधव—— यांनी शासनाच्या विविध योजना सांगताना लोकप्रतिनिधी हा सजग व संयमी असावा सतत पाठपुरावा सुरू ठेवल्यास शासनाच्या योजना या दारापर्यंत आणता येतात ,गावाचा विकास आणि तंटामुक्ती गाव हे ध्येय ठेवल्यास नक्कीच गावाचा कायापालट करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. श्याम अहिरे,हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश चव्हाण,श्रावण राठोड,सुभाष राठोड,छगन राठोड,गुलाब राठोड,रसाल राठोड,मोरसिंग पवार,भाईदास राठोड,रामचंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील,रमेश चव्हाण यांनी आभार मानले.चौकट–
रणाईचे खुर्द गावाला प्रथमच स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला ,ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. मात्र या गावात ग्रामपंचायत इमारत नसल्याने गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी आमदार अनिल पाटील यांना याबाबत सांगितल्याने दोन दिवसात इमारतसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे यावेळी सांगितले,गावाला विकासासाठी सर्वतोपरी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button