डांगसौंदाणे येथील कोविड चांदवड ला स्थलांतरित केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम
डांगसौंदाणे तालुका सटाणा येथील कोविड सेंटर चांदवड येथे स्थलांतरित केल्याने चांदवड शहरात संभ्रमाचे वातावरण
प्रतिनिधी वायकोळे चांदवड
असून याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. डांगसौंदणे हे सटाणा तालुक्यातील एक गाव असून तेथील आदिवासी लोकांनी कोविड सेंटर ला विरोध दर्शवून,निवेदन दिले होते त्याआधारे तेथील कोविड सेंटर चांदवड येथे स्थलांतरित केल्याने चांदवड शहर व परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत.सदर सेंटर हे त्याचं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे सटाणा किंवा शेजारील तालुका देवळा येथे करणे सोयीचे झाले असते मात्र चांदवडच का??अश्या प्रतिक्रिया आता चांदवडकर नागरिकांमधून येत आहेत. काही दिवस अगोदर मालेगाव येथील पेशंट चांदवड ,नाशिक येथे पाठविणार असल्याची चर्चा होती त्यास नागरिकांनी सक्त विरोध केला होता मात्र आता कोविड सेंटरच चांदवड ला स्थलांतरित केल्याचे पुढे काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही डिटेल्स न देता हे दोन तालुके तुम्हाला कव्हर करायचे आहे असे आदेश आले आहेत असे त्यांनी सांगितले






