Amalner

कोकणातील पूरग्रस्तांना सावखेड्यातील तरुणाईकडून मदतीचा हात…

कोकणातील पूरग्रस्तांना सावखेड्यातील तरुणाईकडून मदतीचा हात…

सावखेडा ता.अमळनेर:- येथील तरुणांनी महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव,अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सागर कांबळे ,खान्देशअध्यक्ष ऋषिकेश भांडारकर व जळगावचे गौरव उमप यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ,मीठ, साबण,तेल, पाणी बॉटल,गव्हाचे पीठ व इतर आवश्यक किराणा वस्तूंचे 1200 किट वाटप केले. त्यांनी कोकणातील पोलादपूर, चिपळूण,सुतारवाडी,खेड,महाड आदी भागांत जाऊन वस्तूंचे वाटप केले.

या कार्यासाठी सावखेडा टायगर ग्रुपचे येथील विशाल कदम,चिंचोली येथील आनंद घुगे,सोपान मानकर,बंटी बारी,रवींद्र पाटील,गणेश गोपाळ,सौरव चौधरी,दिपक मराठे,सागर परदेशी, आकाश चौधरी, नंदू मोहिते, गजानन पाटील आदींनी मेहनत घेतली.
फोटो

संबंधित लेख

Back to top button