India

? महत्वाचे…ऍट्रॉसिटीचा एफआयआर कसा द्यावा?…ऍट्रॉसिटी म्हणजे काय?

? महत्वाचे….ऍट्रॉसिटीचा एफआयआर कसा द्यावा?…ऍट्रॉसिटी म्हणजे काय..?

अनुसूचित जाती व अनसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जाती व अनसूचित जमाती लोकांना मारहाण करणे,
त्यांचा खून करणे,
त्यांची मालमत्ता नासधूस करणे,
घराची जाळपोळ करणे,
त्यांना शिवीगाळ करुन अपमानित करणे,
जबर जखमी करणे
त्यांच्या महिलांवर बलात्कार करणे,
त्यांना शिवीगाळ करणे,
त्यांच्या महिलामुलींना पळवून नेणे,
अशा अत्याचाराच्या घटनाचा समावेश होतो.

जर अत्याचार करण्याची घटना घडली आणि भारतीय दंड विधानातील व्यक्ती किंवा मालमत्तेच्या संबंधीचा अपराध ज्यास दहा वर्षापेक्षा अधिक शिक्षा आहे अशी कृती करुन जर अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांवर अॅट्रॉसिटी अत्याचार केला असेल तर अत्याचारग्रस्तास न्याय प्राप्त होण्यासाठी अशा अत्याचाराबाबतचा एफआयआर म्हणजेच प्रथम खबर अहवाल पोलीस स्टेशनला द्यावा लागतो.

असा एफआयआर देत असताना मुलभूत काळजी घ्यावी लागते.

जर काळजी घेतली नाही आणि कशीतरी तकार करायची म्हणून पोलीस स्टेशनला तकार केली तर जरी गुन्हा नोंद झाला व न्यायालयात प्रकरण चालले तरी गुन्हेगार सुटेल व पुन्हा तो दुसरा अत्याचार करील.

त्यानंतर अनुसूचित जाती जमातींच्या लोकांची अशी भावना होईल की आम्ही तकार देऊन काहीच होत नाही, न्याय मिळत नाही त्यापेक्षा तकार करुन काय फायदा? अत्याचार सहन केलेला बरा आणि याच प्रकारामुळे अत्याचाराच्या घटनांची वाढ होत आहे.

म्हणून अत्याचार अॅट्रॉसिटी रोखण्यासाठी तात्काळ एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे.

कायद्याप्रमाणे एफआयआर म्हणजे दखलपात्र गुन्हयाची खबर पोलीस ठाण्यात देणे.

एफआयआर दाखल करताना खालील काळजी घ्या

(१) अत्याचाराची प्रथम वर्दी (एफआयआर) घटना घडल्यावर तात्काळ द्या. कोणत्याही कारणावरुन उशीर करु नका. कारण एफआयआर म्हणजे गुन्हा घडल्याची प्रथम वर्दी देण्यास उशीर झाला तर त्याचा अर्थ बनावट खबर दिली म्हणून आरोपीला फायदा देण्याबाबत उच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे उशीरा खबर दिली तर, आरोपी सुटू शकतो. म्हणून तात्काळ खबर देण्याची काळजी घ्या. गुन्हयाची पहिली खबर घटना घडल्यापासून तात्काळ पोलीस स्टेशन जवळ असल्यास अर्ध्या तासांत खबर द्या. पोलीस स्टेशन दूर असल्यास घटना घडल्यानंतर तात्काळ निघा पोलीस स्टेशनला पोहचा. प्रवासात किती वेळ लागला त्याची सुद्धा नोंद तुमच्या खबरीत लिहा.

२) तुम्ही देत असलेली खबर व्यवस्थित असावी. त्यांत संपूर्ण बाबी काळजीपूर्वक लिहा. अशी खबरीत खालील बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे,

(अ) खबर देणाऱ्याचे नांव, त्याच्या वडिलांचे नाव, वय, आणि पूर्ण रहिवाशी पत्ता

(ब) खबर देणाऱ्याची जात, म्हणजे अत्याचारग्रस्त, ज्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली, त्याची जात नमूद करा, अत्याचाराचा गुन्हा ज्याने केला त्याचीही जात नमूद करा, म्हणजे पोलीस यंत्रणेस कळेल की अत्याचारग्रस्त अनुसूचित जातीची आहे का अनुसूचित जमातींची आहे आणि गुन्हेगार अनुसूचित जाती जमातींचा नाही हे सुद्धा पोलीसांना तात्काळ कळेल. तुम्ही खबरीतच लिहा की गुन्हेगार अनुसूचित जाती जमातींचा नाही. गुन्हयाची तारीख, वेळ व जिथे घटना घडली ते ठिकाण, खबरीमध्ये स्पष्ट नमूद करा.

३) पुरावा देत असताना अत्याचारग्रस्त व्यक्ती, कायद्याच्या अज्ञानामुळे कसा पुरावा द्यावा हे माहित नसल्यामुळे आणि विशेष सरकारी वकीलानी योग्य काळजी न घेतल्यामुळे अत्याचारग्रस्त व्यक्ती न्यायालयात असे सांगू शकली नाही की, “गुन्हेगारास अत्याचारग्रस्त व्यक्ती अनुसूचित जाती जमातींची आहे हे, त्यांस माहित होते”, अत्याचारग्रस्त व्यक्ती अनुसूचित जाती जमातींची आहे या कारणावरुन गुन्हेगाराने हा अत्याचार केला. असे सांगणे कायद्याप्रमाणे अपेक्षित आहे. कारण कायदेशीर तरतुदीतील शब्दरचना तशी आहे. त्यामुळे त्याची पूर्तता न झाल्यामुळे अनेक प्रकरणांत आरोपीला त्याचा फायदा देऊन सोडून देण्यात आले आहे ,आरोपी सुटू शकतो. म्हणून तात्काळ खबर देण्याची काळजी घ्या. गुन्हयाची पहिली खबर घटना घडल्यापासून तात्काळ पोलीस स्टेशन जवळ असल्यास अर्ध्या तासांत खबर द्या. पोलीस स्टेशन दूर असल्यास घटना घडल्यानंतर तात्काळ निघा पोलीस स्टेशनला पोहचा. प्रवासात किती वेळ लागला त्याची सुद्धा नोंद तुमच्या खबरीत लिहा.

*स्पष्टपणे असे नमूद करा* की,

(१) अत्याचार करणार्या गुन्हेगारास अत्याचारग्रस्त व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींची आहे, हे माहित आहे.

(२) अत्याचारग्रस्त व्यक्ती अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींची आहे या कारणावरुन त्याने खबर देणाऱ्यावर किंवा खबर देणान्याच्या नातेवाईकावर अत्याचार केला.

(४) अत्याचारग्रस्त व्यक्ती लहान मुलगा/मुलगी असल्यास किंवा मानसिक दुर्बलाच्या पालकाने किंवा आई, वडिलांनी खबर द्यावी.

(५) अॅट्रॉसिटीची घटना घडताना कोण साक्षीदार हजर होते त्याची नावे खबरीत लिहा. साक्षीदार कोण असावा हे ठरवून नसते. काही वेळा पोलीस असे म्हणतात की, साक्षीदार व्यक्ती अनुसूचित जाती जमातींचा नसलेला असणे आवश्यक आहे, तेव्हा त्यांना सांगा की कोणत्याही कायद्यात तसे नमूद नाही. घटनेचा साक्षीदार नाही अशा व्यक्तीचे नांव खबरीत साक्षीदार म्हणून चुकूनही लिहू नका. तो योग्य साक्ष देऊ शकत नाही व त्याचा फायदा आरोपीस होईल म्हणून अशी चूक करु नका

(६) जर कोणत्या कारणाने खबर (एफआयआर) देण्यास उशीर झाला असेल तर तेच कारण प्रथम खबरीत (एफआयआर) मध्ये नमूद करा. खबर देण्यास विलंब का झाला त्या कारणाचे स्पष्टीकरण कायद्याप्रमाणे न्यायालयासमोर द्यावे लागते. विलंबाचे स्पष्टीकरण दिले नसेल तर न्याय मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. विलंबाच्या कारणाचे स्पष्टीकरण दिल्यास व ते कारण योग्य असल्यास उशीर माफ करण्यासाठी न्यायालय त्या कारणांचा विचार करील तर अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन खोटी खबर देऊ नका. अशा व्यक्तिच्या दडपणांस घाबरुन खोटे, चूक व बेकायदेशीर काम करु नका. खोटी खबर देणारी घटना खोटी असल्यामुळे असे प्रकरण न्यायालयात टिकत नाही. खोटी खबर दिली या बहल प्रशम खबर देणाऱ्या विरुद्ध कार्यवाही होवू शकते. ज्याच्या विरुद्ध खोटी खबर दिली ती व्यक्ती किंवा गट अनुसूचित जाती जमातीवर चिडून पुन्हा दुसरा अत्याचार करु शकेल खोटी खबर देणे म्हणजे अत्याचारास प्रोत्साहन देणे होय. अनुसूचितजाती जमातीच्या लोकांनी अशी शपथपूर्वक प्रतिज्ञा करावी की कोणाच्या दडपणाखाली येऊन खोटी खबर या कायद्यान्वये देणार नाही.

(७) अत्याचारप्रस्त व्यक्ती जबर जखमी असेल तर रक्ताने माखलेले कपडे पोलीस स्टेशनला देवून ते जप्त करा अशी विनती करा. जप्ती पंचनामा तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षकांनीच केला पाहिजे. म्हणून घटना घडल्यानंतर तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस उपअधिक्षकांशी संपर्कात राहावे. तपासातील प्रत्येक कागदपत्रे, तपास टिपणे इत्यादीवर तपास अधिकारी असणाऱ्या पोलीस उपअधिक्षकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

(८) अॅट्रॉसिटीग्रस्त व्यक्तीवर बलात्कार झाला असल्यास घटनेच्या वेळी अंगावरील कपडे रासायनिक विश्लेषणासाठी पोलीस उप अधिक्षकाकडे जमा करावे. त्याचा पंचनामा करणे आवश्यक आहे, तो केला काय याची, खात्री करुन घ्या.

(९) अॅट्रॉसिटीची खबर दिल्यानंतर जर कोणी अत्याचारग्रस्तास व साक्षीदारास धमकी देत असेल, बहिष्कार टाकत असेल तर ती बाब जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांस तात्काळ कळवा. संरक्षणाची, पुनर्वसनाची मागणी करा फौजदारी प्रकिया संहिता कायद्यातील नविन तरतूद कलम १९५-अ प्रमाणे साक्षीदारास धमकी दिली तर धमकी देणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी फिर्याद देता येते. जर कोणी आरोपी किंवा इतर व्यक्ती अत्याचारास्तास किंवा साक्षीदारास धमकी देश अमेज तर वरील कलमातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी तक्रार घा. अर्ज कसा करावा त्याचा नगुना प्रकरण IM देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अत्याचार प्रस्ताचा इन्का तज्ञ वकीलाची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना आणि अत्याचारमन आणि त्याच्या साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणयाकडिा करावयाच्या अर्जाचा नमुना प्रकरण ४ मध्ये देण्यात आला आहे.

(१०) अत्याचारग्रस्त जर गंभीर जखमी असल्यास त्याला ताकाव सरकारी दवाखान्यात न्यावे. अपघातग्रस्त तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अत्याचार कसा घडला तो कोणत्या आरोपीने केला व आरोपीने कोणते हत्यार वापरले यावावतीव संक्षिप्त माहिती द्या. त्याची नोंद मेडिकोलिगल केस रजिस्टर (एमएलसी रजिष्टर) मध्ये केली जाते. वैद्यकीय अधिकाऱ्याचा पुरावा आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी महत्वाचा असतो. म्हणून योग्य माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्याने मेडीकोलिगल रजिस्टरमध्ये नोंदवीले काय याची खात्री करा.

(११) गंभीर जखमी अत्याचार व्यक्तिवर कोणत्या दवाखान्यात उपचार सुरु आहे ती बाब विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यास तात्काळ कळवा. शस्त्रक्रियेची (ऑपरेशनची) जरुरी असल्यास तज्ञ डॉक्टरांची मदत व औषध पुरविण्यासाठी जिल्हा विशेष समाज कल्याण अधिकारी सर्व मदत पुरवितील.

(१२) अत्याचारग्रस्ताने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविल्यानंतर किंवा त्यापुर्वी अत्याचार करणान्याने अत्याचारग्रस्ताविरुध्द फिर्याद दिल्यावरुन जर दरोडा/खंडणी वगैरे गुन्हे नोंदल्यास तो अत्याचारग्रस्तावर झालेला दुसरा एक अत्याचारच होय. म्हणून या अत्याचाराबाबत सुध्दा अत्याचारग्रस्ताने दुसरी फिर्याद सादर करावी व त्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळवावे.

वि. वा. येलवे
वकील उच्च न्यायालय मुंबई
८८९८३४३२८९

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button