Amalner

Amalner: बुद्ध विचारांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता…जयसिंग वाघ

Amalner: बुद्ध विचारांचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता..जयसिंग वा

अमळनेर प्रतिनिधी
– महात्मा फुले यांनी ज्या पद्धतिने भारतात सामाजिक , शैक्षणिक , धार्मिक चळवळ उभी केली ते पाहता असे दिसून येते की , त्यांच्यावर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता , भारतातून बुद्ध हद्दपार झाले असल्याने त्यांच्या हाती बुद्ध विचारधारेचा ग्रंथ आला नाही , त्यामुळे त्यांना बुद्ध सांगता आले नाही , बुद्धग्रंथ त्यांना मिळाले असते तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची चळवळही सुरु केली असती असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .
युवा कल्याण प्रतिष्ठान , अमळनेर तर्फे बुद्ध जयंती दिनी अमळनेर येथे ‘ समतामूलक शिक्षणाचा पाया घालनारे महात्मा फुले ‘ हे पुस्तक राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत प्रकाशित करण्यात आले असता वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , भारतात गौतम बुद्ध यांनी जी व्यवस्था परिवर्तन केली , त्या करीता जी विचारधारा मांडली , स्त्री पुरूष समता प्रस्थापित केली त्याच प्रकारची व्यवस्था परिवर्तन करण्या करीता , स्त्री पुरूष समता निर्मिति करीता बुद्ध विचारधारा महात्मा फुले यांनी मांडून सुमारे चोवीसशे वर्षा नंतर या देशात नवी आमलाग्र क्रांति केली , सर्व जनतेला शिक्षणाचे , स्वाभिमानाचे , मानवतावादाचे , हक्काचे महत्व पटवुन दिले .
प्रास्ताविकपर भाषणात प्रसिद्ध समाजसेवक प्रा . अशोक पवार यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . आम्ही १०५ व्याख्याते तयार केले , विविध स्पर्धा परिक्षे करीता विद्यार्थी बसविली , स्पर्धा परिक्षेची अभ्यासिका तयार केली , राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत लहान लहान पुस्तकांचे प्रकाशन करुन ते विद्यार्थ्यांना मोफत वाटनार , शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन प्रबोधन करणार आहोत . समाजात सामाजिक न्याय व सामाजिक सलोखा या संकल्पना रुजवत आलो असून त्यास सर्वस्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे असेही प्रा. पवार यांनी विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले .
प्रा. लीलाधर पाटील यांनी आपल्या भाषणात भगवान गौतम बुद्ध यांच्या शास्त्रीय विचारांची सविस्तर माहिती दिली , भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानवतावादी विचारवंत होते , त्यांनी दुखः मुक्ति करीता जे जे विचार मांडले ते ते विचार आपण अंगिकारले तर आपण सुखी होउ शकतो , आपण आजही विविध कर्मकांड करत असतो व दुखः ओढवुन घेत असतो , आपल्यातील स्वार्थीपण आपल्याला स्वस्थ बसु देत नाही त्या करीता आम्ही प्रसंगी हिंसक होतो व दुखः ओढवुन घेतो , आपण भगवान बुद्ध यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने चाललो तर आपल्या देशात मानवतावाद रुजेल व सर्व लोक सुखी होतील . जगातील विविध देशांमध्ये बुद्ध विचार प्रचारित होत असून लोक बौद्ध होत आहेत असेही प्रा. पाटील यांनी सांगितले .
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी बुद्ध विचार आजही उपयुक्त असून आपण ते विचार अंगीकारुन जीवन जगणे गरजेचे आहे , बुद्ध हे संपूर्ण जीवन मानवी कल्याण करण्या करीता लढले , त्यांचा तो संघर्ष आजही प्रेरणादाई आहे असे विचार व्यक्त केले .
संभाजी ब्रिगेड चे बापूराव ठाकरे यांनी सुरवातीस बुद्धगीत सादर केले व बुद्ध विचारांचे महत्व विशद केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एस. टी. माळी होते , सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अशोक पवार यांनी केले . योगेश मुंदडे , प्राचार्य ए. बी. जैन , राजू महाले यांनीही विचार व्यक्त केले शेवटी विविध व्याख्याते यांना मान्यवारांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी अशोक बि-हाड़े ,मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, पत्रकार ईश्वर महाजन ,उमेश काटे,रवि मोरे,डि.ए.धनगर, सोपान भवरे , दयाराम पाटील , गौतम मोरे , तिलोत्तमा पाटील , मनोहर नाना पाटील , अरुण देशमुख , रियाजभाई आदिंसह बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात हजर होती .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button