Ratnagiri

चिऊताई खाऊ खा, पाणी पी!बालकांची साद

चिऊताई खाऊ खा, पाणी पी!बालकांची साद

रत्नागिरी : सध्या कडक ऊन पडू लागले आहे. पशु पक्षी व प्राणी पाण्यासाठी वनात व इतरत्र भटकत आहेत.अशा मुक्या पशु पक्ष्यांसाठी पांगारवाडी दापोली येथील आपल्या घरासमोर हॅरी पावरा व हॅलन पावरा या लहान बालकांनी पाणी व खाऊची व्यवस्था केली आहे. लाॅकडाऊनमुळे ही मुलं सध्या घरीच आहेत.आपल्या घरासमोरच त्यांनी हा सुंदर उपक्रम तयार केला आहे.
चिऊताई ये,खाऊ खा व पाणी पी! अशी पक्ष्यांना ही लहान बालके साद घालत आहेत. या मुलांनी आपल्या घरातील टाकाऊ वस्तू पासून चिऊताई साठी ह्या वस्तू बनवल्या आहेत. एका भांड्यात दाणे,खाऊ ठेवले आहे तर दुसर्या भांड्यात पाणी ठेवले आहे. ही दोन भांडे एका सुंदर गुलाबी फुल झाडाच्या फांदीवर अडकवले आहेत. “आम्ही टाकाऊ भांड्यापासून चिऊसाठी दोन वस्तू बनवले आहेत. चिऊताई रोज आमच्या घरासमोर येते. खाऊ खाते, पाणी पिते व उडून जाते .चिऊताई आम्हाला खूप आवडते.म्हणून आम्ही पक्ष्यांसाठी खाऊ व पाण्याची व्यवस्था केली आहे. असे ही चिमुकली बालके म्हणाली.
बाल वयातच या बालकाद्वारे सामाजिक भान जपलं जात आहे व पर्यावरणातील पशू पक्ष्यांचं रक्षण केल जात आहे. या लहान बालकांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशीलकुमार पावरा यांची ही बालके असून आपल्या वडिलांपासून समाजकार्याचे आदर्श घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button