Ahamdanagar

ना आमदार ना खासदार ज्योती फौंडेशन, चितळी ग्रामस्थांचा आधार, स्वखर्चाने बांधला दगडी रामसेतू पुल

ना आमदार ना खासदार ज्योती फौंडेशन, चितळी ग्रामस्थांचा आधार, स्वखर्चाने बांधला दगडी रामसेतू पुल

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चितळी-वडुले-कोपरे या रस्त्यावर ज्योतीताई आमटे जनसेवा फौंडेशन च्या वतीने दगडी रामसेतू पूल स्वखर्चाने बांधन्यात आला आहे.सरकारी रस्त्यावर पुल बांधायचा म्हटल्यावर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांचे उंबरठे झिजावे लागतात. परंतु चितळी ग्रामस्थांनी गावातील रहीवासी असलेले औरंगाबाद येथील उद्योजक अशोक आमटे यांच्या ज्योतीताई आमटे फौंडेशनच्या माध्यमातून १ लाख २७ हजार ५०० रूपये खर्च करून दगडी पूल बांधून शेतकऱ्यांना दिलासा दिला.सदर रामसेतू पुलाचा लोकार्पण सोहळा तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, यांच्या हस्ते आणि वारकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे,उद्धव महाराज ढमाळ,पवार महाराज, क्रुष्णा ताठे,जाधव महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.देशाला स्वातंत्र्य मिळुन ७३वर्षे झाली परंतु या रस्त्याला डांबरीकरणाचा साधा स्पर्श ही झालेला नाही ही या भागातील विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या विकास कामाची पावती म्हणावी लागेल. रस्त्याने जाताना अनेक प्रवाशांना आपले हातपाय मोडून घ्यावे लागले. पण निवडणूकित मताचा जोगवा मागणाऱ्या कोणत्याही नाठाळ पुढाऱ्याने या रस्त्याकडे लक्ष दिले नाही ही खरी या भागातील मतदारांची शोकांतिका आहे.ज्योतीताई आमटे फौंडेशनच्या माध्यमातून फौंडेशनचे सचिव समाजसेवक बाबा आमटे,अमोल कदम,सुनिताताई आमटे,अशोक कुटे,दगडू कोठूळे,बाळासाहेब कोठुळे,सर्जेराव साळवे यांनी विषेश लक्ष घालून हा रामसेतू पूल एका आठवड्यात १४७ ट्रँक्टरच्या खेपा टाकून पुर्ण केला. या वर्षी जास्त प्रमाणात पाउस झाल्यामुळे पाण्याचा सुकाळ असला तरीही या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला होता. माझी स्व. झालेली मुलगी ज्योतीताई आमटे हीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुल बांधन्यात आला असुन पुढील वर्षीच्या स्मृती दिनापर्यंत हा पुल सिमेंट काँक्रीटीकरण झालेला असेल अशी ग्वाही फौंडेशनचे अध्यक्ष अशोक आमटे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button