फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करित शिंदे परिवाराच्या वतीने घरीच बुद्ध जयंती साजरी .
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
सार्वजनिक ठिकाणी साजरी होणारी बुध्द जयंती यावेळी घरोघरी साजरी .
विश्वमानवतेचे आद्य प्रवर्तक समता , शांती , बंधुभाव , प्रज्ञा , शील , करूणा , निविवेकबुध्दीचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखविणाऱ्या महाकारूणी तथागत गौतम बुध्दाची आज २५६४ वी जयंती सर्वत्र साजरी होत असताना कोरोना महामारीचे संकट उभे राहीले आहे. कोरोनाच्या संकटाने जग सध्या हवालदिल झालेले आहे आज मानवी कृर्तृत्वच कोरोनाचा पराभव करायला सिध्द झाले आहे .
सालाबादाप्रमाणे परंडा शहरात मोठया धुमधडाक्यात बुद्ध पौर्णिमेला साजरी होणारी बुध्द जयंती यावेळी साध्या पध्दतीने घरोघरी बौध्दसमाज बांधवाच्या वतीने साजरी केली असून त्याच अनुषंगाने परंडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करित भर चौकात साजरी होणारी बुध्द जयंती गर्दी टाळण्यासाठी यावेळी घरीच बुध्दवंदना घेऊन साजरी केली .
यावेळी शिंदे परिवारातील सदस्य तानाजी शिंदे , बुद्धपाल शिंदे , राष्ट्रपाल शिंदे , भाग्यश्री शिंदे , कोंतीका शिंदे आदि उपस्थीत होते .






